PV Sindhu Japan Open : जपान ओपन २०२६ बॅडमिंटन: सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टोकियो : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक करत, चीनच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या हान यूला सरळ गेम्समध्ये पराभूत केले आणि गुरुवारी येथे झालेल्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. संथ सुरुवातीनंतर, सिंधूने पहिल्या गेमच्या मध्यावर आपली लय पकडली आणि शटलवर सफाईदारपणे प्रहार करत रॅलीवर नियंत्रण मिळवले आणि आघाडी घेतली. ( PV Sindhu Japan Open)



सध्या बॅडमिंटन क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूने अवघ्या ३५ मिनिटांत चीनच्या हान युचा (जी जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर आहे) २१-१६, २१-१४ असा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आता 'बीडब्ल्यूएफ सुपर ७५०' स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तिला माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहाराचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण कोरियाची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू 'आन से-यंग'ने दुसऱ्या फेरीतील सामन्यातून माघार घेतल्यामुळे ओकुहाराला पुढील फेरीत प्रवेश मिळाला. ( Japan Open Badminton)


ओकुहाराविरुद्धच्या आगामी सामन्याबद्दल बोलताना सिंधू म्हणाली, "आम्ही लहानपणापासून विशेषतः 'अंडर-१९' गटापासून एकमेकींविरुद्ध खेळत आलो आहोत आणि आमचे अनेक सामने झाले आहेत. मला वाटते की उद्याचा सामना खूप रोमांचक असेल." ( PV Sindhu Quarterfinal)



ती पुढे म्हणाली, "अलीकडच्या काळात तिची कामगिरीही चांगली झाली आहे आणि तिने काही उत्तम सामने खेळले आहेत. आज तिचा सामना नाही कारण आन से-यंगने माघार घेतली आहे. पण माझ्यासाठी, परत जाऊन शरीराला योग्य विश्रांती देणे आणि अधिक ताकदीनिशी परतणे महत्त्वाचे आहे." ( Badminton News)


दरम्यान, लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी या दोघांनाही पहिल्या फेरीतील सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना त्यांच्या सलामीच्या सामन्यादरम्यान दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ( China Badminton)

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या