‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आधुनिक जीवनातील धावपळ, कुटुंबातील मतभेद आणि अध्यात्मातून जीवनाला मिळणारी नवी दिशा यांची भावस्पर्शी झलक या टीझरमधून पाहायला मिळते. ( Samarth Movie)


टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध—या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची योग्य दिशा देणारे आहेत, हे टीझर सूचकपणे अधोरेखित करतो. ( Samarth Movie Teaser)



या विचारांचा या कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का? समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत.


दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणतात, "'समर्थ' हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला स्वतःची वाटेल, असा आम्हाला विश्वास आहे." ( Marathi Entertainment News)



निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, "'समर्थ' हा चित्रपट म्हणजे दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा एक प्रयत्न आहे. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्ये यांचा सुंदर समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक पिढीला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडणारा हा चित्रपट ठरेल, असा मला विश्वास आहे."  (Entertainment News)


थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित 'समर्थ' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक संदर्भात घेतलेला हा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल. ( Latest Marathi Movie)


या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’