BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत


घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना घाई, विरोधकांकडून सभात्याग


मुंबई : मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) रितू तावडे (Ritu Tawde) यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणले. सभागृहामध्ये एकदा तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी पक्ष नाकीतोंडी आपटल्यानंतर पुन्हा अशाप्रकारचे प्रस्ताव न आणण्याचा निर्धार केल्यनंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केली. घाटकोपर येथील घाटकोपर किरोळ मधील खोत लेनमधील एक रस्ता रेषा संदर्भातील तातडीचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला घेण्यात आला. परंतु विरोधकांनी यावर पोलची मागणी केल्यानंतर महापौरच अडचणी आले आणि त्यांनी पोल विचारात न घेता या प्रस्तावासह पुढील सर्व तातडीच्या प्रस्तावांवर विशेष सभेत निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले. यामुळे विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला आणि सभात्याग करत याचा निषेध व्यक्त केला.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात तातडीचे कामकाज क्रमांक २१ ला प्रशासनाच्यावतीने अग्रक्रम देण्याची प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्तांनी केल्यानंतर महापौरांनी सभागृह नेत्यांना हा प्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वीच विरोधी पक्षाने पोलची मागणी केली.त्यामुळे सभागृहनेत्यांनी घाटकोपर मधील किरोळ यांनी बाधित ऑफ खोत लेन रस्ता जो एका टोकास बंद रस्त्यास ९ मीटर रुंदीची नियमित रस्तारेषा संदर्भातील प्रस्तावाचा विषय वाचून दाखवला. पण विरोधकांनी पोलची मागणी केल्यानंतर महापौरांनी काही क्षण महापालिका सचिव यांच्यासोबत चर्चा करून काही वेळाने पोलची मागणी न स्वीकारता थेट विशेष सभेत हे प्रस्ताव विचारात घेतले जातील असे जाहीर करून टाकले. त्यामुळे विरोधकांनी महापालिका सचिव आणि महापौरांच्या विरेाधात घोषणा देत सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापौरांनी सभागृहनेत्यांचे नाव हरकतीच्या मुद्दा मांडण्यासाठी पुकारल्याने महापौरांकडून झालेले नियमबाह्य कामकाजाचा निषेध म्हणून विरोध करत सभात्याग केला.



तातडीच्या कामकाजाचा प्रस्ताव पुकारल्यानंतर जर कुणी पोलची मागणी केली, तो स्वीकारुन मतदान घेणे बंधनकारक आहे आणि यामध्ये जर तीन तृतीयांश सदस्यांचे मतदान विरोधात गेले तो प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून स्वीकारला जात नाही,तो राखून ठेवावा लागतो. त्यानुसार हा प्रस्ताव अग्रक्रम फेटाळला जावून तो प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की आली. परंतु पोलचा स्वीकार न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.


विशेष म्हणजे हा प्रस्ताव घाटकोपरमधील रस्ता रेषे संदर्भातील होता आणि महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील असल्याने तसेच यापूर्वी तातडीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी पक्षाची पोलमुळे अग्रक्रम फेटाळत नामुष्की सहन करावी लागल्यानंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केल्यामुळे महापालिकेतील कामकाज पध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. तातडीचे कामकाजाचे प्रस्ताव यापुढे स्वीकारु नये अशाप्रकारची भूमिका असतानाही महापौरांनी हे प्रस्ताव कसे स्वीकारले आणि स्वीकारताना सभागृहनेत्यांना याची कल्पना का दिली नाही आणि सभागृहनेत्यांना याची कल्पना दिल्यानंतरही ते राजी कसे झाले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे महापौरांकडून सलग दुसऱ्यांना अशाप्रकारची चूक झाल्यामुळे पक्षाला आता महापालिकेच्या कामकाजात झाकून पाहण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून