Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुदतवाढ देण्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची विनंती आयोगाने मान्य केली आहे. (Maharashtra Election)


सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरभेटी घेऊन मतदार पडताळणीची मोहीम राबवतील. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि आवश्यक पुनर्रचना देखील पूर्ण केली जाणार आहे. (Voter List)



१७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा हरकती नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. (Election Commission)


दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. (Voter Registration)



मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पात्र नागरिकांना निर्धारित कालावधीत आवश्यक गणना प्रपत्र भरून मतदार यादीत नाव समाविष्ट किंवा दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.SIR 2026,


Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी