Sir Garfield Sobers : सर गारफिल्ड सोबर्स यांचे ८९ व्या वर्षी निधन

ब्रिजटाउन : क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडूंचे प्रतीक मानले जाणारे सर गारफिल्ड सोबर्स यांचे शुक्रवारी बार्बाडोस येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. (Sir Garfield Sobers )



वेस्ट इंडीजचे हे महान क्रिकेटपटू १९५४ ते १९७४ या दोन दशकांच्या कारकिर्दीत क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवत होते. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी असे निकष प्रस्थापित केले, जे आजही अनेकांसाठी ध्येय आहेत. 'क्रिकेट वेस्ट इंडीज'ने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, "एका महान इनिंगचा आज शेवट झाला आहे. ते आमच्या हृदयात नेहमीच राहतील."



सोबर्स यांनी वेस्ट इंडीजसाठी ९३ कसोटी सामने खेळताना ५७.७८ च्या सरासरीने ८,०३२ धावा केल्या, ज्यामध्ये २६ शतकांचा समावेश आहे. गोलंदाज म्हणून त्यांनी ३४.०३ च्या सरासरीने २३५ बळी घेतले. विशेष म्हणजे, ते वेगवान गोलंदाजीसोबतच ऑर्थोडॉक्स आणि रिस्ट स्पिन अशी दोन्ही प्रकारची गोलंदाजी सारख्याच प्रभावीपणे करू शकत होते. १९५८ मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३६५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. ३६ वर्षे हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम होता. १९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा कारनामा करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.सोबर्स यांच्या अतुलनीय योगदानासाठी १९७५ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना 'नाइटहूड' देऊन सन्मानित केले होते. २००० मध्ये त्यांना 'विस्डनचे २० व्या शतकातील पाच क्रिकेटपटू' म्हणून गौरवण्यात आले होते. आजही आयसीसी दरवर्षी पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला 'सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी' देऊन सन्मानित करते.(Sir Garfield Sobers )

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून