Cricketer Arrest : क्रिकेट विश्वात खळबळ ! भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या खेळाडूला अटक; नेमकं प्रकरण काय ?


श्रीलंका : श्रीलंकेत आज (१८ जुलै) पासून लंका प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यापूर्वीच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारताला अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकूण देणाऱ्या खेळाडूला श्रीलंकेत अटक झाली आहे. जाफना किंग्स संघाचा सह संघमालक असलेला मनजोत कालरा  याला श्रीलंका पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या वर खेळाडूला लाज देण्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावरुन श्रीलंकेच्या क्रीडा भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्याला तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे. (Sri Lanka )




२०१८ ला अंडर-१९ विश्व विजेता 


भारतीय संघाने अंडर-१९ (२०१८) चे विजेतेपद पटकावले होते. संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवूनम  जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यात मनजोत कालराने शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीमुळे तो प्रकाशझोतात आला होता. (Indian Cricketer)



नेमकं प्रकरण काय ? 



 दरम्यान २०२६ च्या सुरुवातीलाच त्याने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत एक संघ खरेदी करण्यासाठी गुंतवणीक केली आहे. तो जाफना किंग्स संघाचा सह संघमालक झाला आहे. श्रीलंकेच्या पोलिसांनी त्याच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी एका खेळाडूला पैसे देऊन मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीसांच्या तपासात अडळून आले आहे की, मनजोत कालराने स्पर्धा सुरु होण्याच्या १० दिवसांआधीच खेळाडूला संपर्क केला होता. संबधित खेळाडूने ही बाब अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तपास करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी मनजोत कालराला अटक केली आहे. (Match Fixing)




पुढे पोलीसांनी सांगीतले की, त्याच्या विरोधात ही तक्रार श्रीलंकेचे क्रिकेटपटू अविष्का फर्नांडो, भानुका राजरक्षे आणि दुनिथ वेल्लालागे यांनी केली होती. हे तिघेही जाफना किंग्स संघातील खेळाडू आहेच. या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्टला स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लंका प्रीमियर लीग ही मॅच फिक्सिंग, लाचखोरी आणि भ्रष्टाचाराशी संबधित आरोपांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मॅच फिक्सिंगच्या आरोपात एका फ्रँचायजीच्या मालकाला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुणवण्यात आली होती. यासह न्यायालयाने २४ दशलक्ष श्रीलंकन रुपयांचा दंड ठोठावला होता.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून