FIFA World Cup 2026 : मेस्सीला रोखण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार! माजी फुटबॉलपटूने सांगितली खास युक्ती

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी येथे अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात खेळला जाईल. या सामन्याचे भारतात २० जुलै रोजी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता प्रसारण केले जाईल. या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू रॉबी फॉलने अंतिम सामन्यात मेस्सीला रोखण्यासाठी एक महत्त्वाची युक्ती सांगितली आहे. (Lionel Messi)



इंग्लंडचा माजी स्ट्रायकर रॉबी फाउलरच्या मते, अंतिम सामना जिंकण्याची स्पेनची शक्यता अधिक आहे. तथापि, लिओनेल मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे जो एकहाती सामन्याचा निकाल बदलू शकतो. स्पेनची मिडफिल्ड विश्वचषकातील सर्वात चांगली आहे, परंतु मेस्सीसारख्या आक्रमकाला संपूर्ण ९० मिनिटे रोखणे हे फुटबॉलमधील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे.झी5 शोमध्ये बोलताना रॉबी फाउलरने सांगितले की, लॅमिन यामाल अंतिम सामन्यात एक वेगळाच खेळाडू असेल आणि तो आणखी चांगली कामगिरी करेल. रॉबीच्या मते, स्पेनला थोडासा फायदा आहे कारण रॉड्री या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे.



मेस्सीला रोखण्यासाठी रॉबीचे मास्टर प्लॅन


फाउलर म्हणाले की, या विश्वचषकात स्पेनने सर्वाधिक वेळ चेंडूवर ताबा ठेवला आहे. त्यांनी सुचवले की चेंडूवर ताबा ठेवण्याची ही शैली अर्जेंटिनासाठी धोकादायक ठरू शकते. ते म्हणाले, हे स्पष्ट आहे की स्पेनकडे चेंडूचा ताबा जास्त असेल. जर तुम्हाला मेस्सीने खेळावर नियंत्रण ठेवू नये असे वाटत असेल, तर त्याला चेंडू देऊ नका. हे बोलायला सोपे आहे, पण करायला कठीण आहे. पण स्पेन कसा खेळतो हे आपण पाहिले आहे.




अनेकांनी मेस्सीला रोखण्याचे प्रयत्न केला पण...


मात्र, फाउलरने हे मान्य केले की, मेस्सीविरुद्ध सर्वात प्रभावी डावपेचही नेहमीच यशस्वी होऊ शकत नाहीत. तो म्हणाला, "आपण सर्वजण एकत्र बसून मेस्सीला कसे थांबवायचे याचा विचार करतो. पण सत्य हे आहे की, तुम्ही त्याला पूर्णपणे थांबवू शकत नाही, कारण तो मेस्सी आहे आणि खात्रीने तो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांत अनेक प्रशिक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यापैकी बहुतेक अयशस्वी ठरले आहेत.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या