Electricity Bill : लाईट बिल अचानक जास्त आलंय? थेट भरण्याची चूक करू नका, नाहीतर...

जास्त आलेल्या वीज बिलाची तक्रार कशी करावी? जाणून घ्या


मुंबई : तुम्हाला माहितीये का ? जर या महिन्यात तुमचं लाईट बिल अचानक खूप जास्त आलं असेल, तर ते तसंच भरणं तुमच्या खिशाला महागात पडू शकतं! होय, जास्त आलेलं लाईट बिल तुम्ही थेट न भरता, ते चक्क कमी देखील करू शकता. कसं ?(Electricity Bill)






लाईट बिल कमी करण्यासाठी भारत सरकारचा आणि वीज वितरण कंपनीचा एक अधिकृत मार्ग आहे. सगळ्यात आधी तुम्हाला '१९१२' या टोल-फ्री नंबरवर कॉल करायचा आहे. कॉल लागल्यावर कस्टमर केअरला सांगा की, 'माझं वीज बिल या महिन्यात अपेक्षेपेक्षा खूप जास्त आलं आहे, आणि मला याची तक्रार नोंदवायची आहे.'" आता लक्षात ठेवा, कॉल करण्यापूर्वी तुमच्याकडे ३ महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. १) तुमचा कंझ्युमर नंबर २) तुमच्या मीटरचं सध्याचं रीडिंग (तुम्ही मीटरचा फोटो काढून ठेवू शकता) ३) तुमच्या वीज बिलाची संपूर्ण माहिती. ही माहिती दिल्यावर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला मेसेजद्वारे एक 'कंप्लेंट रेफरन्स नंबर' मिळेल. हा नंबर जपून ठेवा.



"आता ही तक्रार तुम्ही नक्की कधी करू शकता? जर तुमचं घर बंद असूनही बिल जास्त आलं असेल, मीटर वेगाने पळत असेल, किंवा रीडिंग चुकीचे वाटत असेल. तक्रार नोंदवल्यानंतर ३ ते ७ दिवसांच्या आत वीज विभागाचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मीटर तपासतील. जर त्यांच्या सिस्टीममध्ये किंवा मीटरमध्ये खरंच काही चूक आढळली, तर तुमचं बिल कमी करून किंवा ॲडजस्ट करून तुम्हाला नवीन बिल दिलं जाईल." पण समजा, एवढं करूनही तुमचा प्रश्न सुटला नाही आणि कंपनीने दाद दिली नाही, तर काय करायचं? त्यासाठी हा दुसरा उपाय म्हणजे तुम्ही थेट '१९०५' किंवा खाली दिलेल्या '१८००-११-४०००' या नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन वर कॉल करून तक्रार करू शकता. इथे तक्रार केल्यावर सरकारकडून थेट वीज कंपनीवर दबाव आणला जातो आणि तुमचं काम मार्गी लागतं." ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येकाच्या खिशाचे पैसे वाचवणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी प्रहार न्यूजलाईनला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद!"

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण