Ashish Shelar : प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली, तर उद्धव ठाकरेंनी फक्त त्रास!

मंत्री आशिष शेलार यांचा टोला; रामभक्तीवर बोलण्याआधी त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी



मुंबई : उबाठा गटाकडून सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनावरून भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला स्वतःहून सत्ता सोपवली होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरे यांना राजकीय जीवनात कशा प्रकारे त्रास दिला, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. रामभक्तीवर बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आधी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, कारण ज्या काँग्रेसने प्रभू रामाचे अस्तित्वच नाकारले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव यांनी सत्ता उपभोगली, असा घणाघातही शेलार यांनी केला.(Ashish Shelar)



मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. विशिष्ट मंडळींना खूश करण्यासाठीच उद्धव ठाकरे हे आंदोलन करत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राम मंदिर तिजोरीतील कथित अपहाराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. ज्यांचा यात हात आहे, त्यांच्या चौकशीसाठी तातडीने एसआयटी स्थापन करण्यात आली असून दोषींना अटकही झाली आहे, तर काहींनी राजीनामेही दिले आहेत.



मनसे आणि उबाठाच्या ऐक्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन भावांनी किंवा त्यांच्या पक्षांनी एकत्र यावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक व अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे विचाराल तर सध्या त्यांच्यात कसलेही ऐक्य राहिलेले नाही, हे उघड झाले आहे. उबाठा गटाच्या या रामरक्षा आंदोलनापासून काँग्रेसने स्वतःला लांब ठेवले आहे. संजय राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना या आंदोलनाचे आमंत्रण देतात, मात्र स्वतःच्या आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बोलवत नाहीत, असा चिमटाही शेलार यांनी काढला.




आंदोलनाचे राजकारण करणे चुकीचे



सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईवरून सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच पोलिसांनी संवेदनशीलपणे ही कारवाई केली आहे, मात्र राऊत नेहमीप्रमाणे याचा विपर्यास करत आहेत. 'नीट' परीक्षेतील गोंधळावरही सरकारने कोणालाही पाठीशी घातलेले नाही. पोलिसांनी तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक केली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच परीक्षा पार पडली आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असला, तरी त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असे शेलार म्हणाले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर अधिक बोलणे त्यांनी टाळले असून, दोन्ही पक्षांचे नेते आपापसात चर्चा करून काय तो निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा