Girish Mahajan : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा - महाजन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध घाट, रस्ते तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि मार्च 2027 या विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.(Nashik News)



नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा(Kumbhamela) आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेले विविध घाटांची कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय तसेच प्रलंबित बाबींचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. ही कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. कामांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध विभागांनी एकत्रित आणि समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलिस, वन विभागाने त्यांच्याशी संबंधित बाबी एकत्रितपणे मार्गी लावून कामांना वेग द्यावा, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.



यावेळी गोदावरी नदीवरील उजव्या तिरावर गोदावरी कपिला नदीच्या संगमाच्या वरील बाजुस घाट बांधणे, गोदावरी नदीवरील डाव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या खालील बाजुस घाट बांधणे, गोदावरी नदीच्या डाव्या तिरावर ओढा येथे गणपती मंदिरा लगत उर्ध्व व निम्न बाजुच्या लांबीत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाकरिता "ओढा राम घाट" व परिसर विकसीत करणे, दसक पूलाच्या उर्ध्व बाजूकडील दसक शिवारात उजव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसीत करणे, दसक पूलाच्या उर्ध्व बाजूकडील नांदूर शिवारात डाव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसीत करणे, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकिनारी (उजवा व डावा तीर) नवीन घाट बांधकाम व अनुषंगीक कामे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रीत पाणीसाठे पुर्णपणे भरण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रवाहित राहण्यासाठी गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेची कामे आणि गोदावरी नदीवरील डाव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे तसेच गोदावरी नदीवरील उजव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे आणि गोदावरी नदीवरील नंदिनी संगम येथे रबर बंधारा (बलुन बंधारा) बांधणे या कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. अधिक्षक अभियंता श्री. मिसाळ यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त श्री. गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली. यावेळी संबंधित प्रकल्पांशी निगडित सर्व भूसंपादन अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी, संबंधित कार्यकारी अभियंते, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी