मियामी : फिफा विश्वचषक २०२६ मधील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात इंग्लंडने ६-४ ने फ्रान्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या सामन्यात फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेने दोन गोल आणि एक असिस्ट करत वैयक्तिक पातळीवर इतिहास रचला. त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीला मागे टाकत सर्वाधिक गोल केले आहे.
एम्बाप्पेने या सामन्यात दोन गोल आणि असिस्ट करत विश्वचषकाच्या इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. आता एम्बाप्पेने दोन गोलकरत नावावर स्पर्धेत एकूण १० गोल झाले असून, त्याने ८ गोल करणाऱ्या लिओनेल मेस्सीला मागे टाकत गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर, एम्बाप्पेने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. तो आतापर्यंत तीन विश्वचषक स्पर्धेचा भाग राहिला आहे. यात त्याने केवळ २२ सामन्यांत २२ गोल केले आहेत, तर त्याच्या मागे लिओनेल मेस्सी आहे. मेस्सीने ३३ सामन्यांत २१ गोल केले आहेत.
वर्ल्ड कपच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या हाफमध्येच ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. डेक्लन राईस, एझरी कॉन्सा आणि बुकायो साकाच्या दोन गोलांच्या जोरावर इंग्लंडने फ्रान्सला मोठा धक्का दिला. फ्रान्सचा पराभव निश्चित मानले जात होते. मात्र, दुसर्या हाफमध्ये फ्रान्सने सामन्यात दमदार पुनरागमन करत चार गोल केले. एम्बाप्पेने ४८ व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर ब्रॅडली बारकोलाने गोल करत फरक कमी केला. एम्बाप्पेने पुन्हा एकदा ६६ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाना चांगली लय मिलवून दिली होती. एम्बाप्पेने आणि फ्रान्सच्या आक्रमक खेळामुळे इंग्लंडवर दबाव वाढला होता.मात्र, अखेरीस इंग्लंडने ६-४ असा विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.आता सर्वांचे लक्ष विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागले असून स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या एम्बाप्पेच्या विक्रमाकडेही फुटबॉल विश्वाचे लक्ष्य लागले आहे.