Ind vs Eng : भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल! जसप्रीत बुमराह संघातून बाहेर; नेमकं कारण काय ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवत इंग्लंडने मालिकेत दमदार पुनरागमन केल.त्यांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यामुळे लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार तिसरा सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात भारतीय संघात के. एल. राहुल, प्रिन्स यादव आणि अर्शदिप सिंह यांना प्लेइंगमध्ये स्थान देण्यात आले आहे. (Ind vs Eng)




बुमराह प्लेइंग-११ मधून बाहेर


तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा स्टार गोलंजदाज जसप्रीत बुमराह संघातून बाहेर झाला आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेकीनंतर स्पष्ट केले की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो संघातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अर्शदिपचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात युवा गोलंदाज प्रिन्स यादवलाही संधी देण्यात आली आहे. (Jasprit Bumrah)



सध्या इंग्लंडने २४ षटकांत १७५ धावा केल्या आहेत. बुमराहच्या अनुपस्थितीत, भारतीय गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये विकेट घेता आलेली नाही. इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत: बेन डकेटने ८० चेंडूंमध्ये ६९ धावा, तर जेकब बेथेलने ८६ चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या आहेत. बुमराहशिवाय भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या या जोडीला बाद करणे आवश्यक आहे.




लॉर्ड्सवरील भारताची कामगिरी


भारतीय संघाने लॉईसवर आतापर्यंत ९ वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले, ४ सामने गमावले, तर १ सामना रद्द झाला आहे. यात इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्ससवर भारताने ८ वनडे सामने खेळले असून त्यात ३ विजय, ४ पराभव, तर १ सामना बरोबरीत राहिला आहे. त्यामुळे निर्णायक तिसऱ्या वनडेत भारतासमोर लॉर्ड्सवरील आपली आकडेवारी सुधारण्याची संधी असेल. (Lord's Cricket Ground)



भारत प्लेइंग इलेव्हन


रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध्द कृष्णा


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन


बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग

Comments
Add Comment

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या

मिनी लीलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! दिग्गज खेळाडूला सोडलं आणि वाचवले 10.35 कोटी

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सुरू होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ताज्या

शाही मार्गावर क्रिकेटचा थरार! प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणेचा बॅटमधून जलवा

लंडन : क्रिकेटची आवड आणि पर्यावरणीय संरथाचा संदेश देणारा एक अनोखा नजराणा लंडनच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला.

IND vs WI, 4th T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, वैभव संघात आहे की नाही? श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि वेस्ट इंडिज चौथ्या टी20 सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजची करो या मरोची