Mahadev Betting App : महादेव सट्टा अ‍ॅप घोटाळा: शेफाली बग्गाच्या चौकशीनंतर ED अ‍ॅक्शन मोडमध्ये; हाय-प्रोफाईल सेलिब्रिटींवर अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली : महादेव सट्टा अॅपशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तपासाची व्याप्ती वाढवली असून अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे तपासात समोर येत आहेत. उद्योगपती विकास गर्ग यांना अटक केल्यानंतर ईडीने टीव्ही होस्ट आणि बिग बॉसची माजी स्पर्धक शेफाली बग्गा यांचीही चौकशी केली आहे. (Mahadev Betting App)


तपासादरम्यान शेफाली बग्गाने सट्टा अॅपच्या जाहिरातींसंबंधी व्यवहार तिचे वडील पाहत असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांची जबाबदारीही त्यांच्याकडे असल्याचे तिने चौकशीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 30 मे रोजी ईडीने (ED) दिल्लीतील तिच्या निवासस्थानी छापा टाकून सुमारे 30 लाख रुपये जप्त केले होते. तपास यंत्रणेनुसार, ही रक्कम अॅपच्या प्रचारातून मिळाल्याचा संशय आहे. यानंतर तिला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.



या प्रकरणात ईडीने उद्योगपती विकास गर्ग (Vikas Garg) यांच्याशी संबंधित सुमारे 907.44 कोटी रुपयांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार तपास अधिक वेगाने सुरू असून विविध क्षेत्रातील काही नामांकित व्यक्तींनाही चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.



तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या कथित सट्टेबाजी नेटवर्कशी संबंधित निधीपैकी मोठी रक्कम परदेशातील कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आल्याचा संशय आहे. या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. (Betting App)


दरम्यान, या कारवाईमुळे छत्तीसगडच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी प्रतिक्रिया देत, कायद्यापुढे सर्व समान असून दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. (Beeting Scam)


सध्या ईडीकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Cyber Crime)

Comments
Add Comment

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Nashik : नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण, 24 तासात कधीही धान्य मिळणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं लोकार्पण करण्यात आले आहे.

Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजानचा दबदबा कायम! सलमानच्या वक्तव्याने वेधलं लक्ष जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन

भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Mumbai Apmc Market : सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूट्स महागले; मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ

मुंबई : सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी