Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीत भाविकांना दिलासा; मंदिर समितीकडून अन्नदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत मोफत अन्नदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना चहा, पिण्याचे पाणी आणि खिचडी यांचे मोफत वाटप करण्यात येत असून, या उपक्रमाला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Ashadhi Wari 2026)


आषाढी वारीदरम्यान दरवर्षी २० ते २५ लाख भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यामुळे दर्शन रांग १० ते १४ किलोमीटरपर्यंत लांब जाते. यंदा वारकऱ्यांना जलद आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (Ashadhi Wari 2026)



या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन प्रक्रियेला गती मिळाली असून, पूर्वीप्रमाणे सात ते आठ तास ताटकळत उभे राहण्याचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून VIP दर्शन बंदीची अंमलबजावणी सुरळीत सुरू असल्याची खात्री केली. (Ashadhi Wari 2026)



दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन होणार असून, स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारकरी-भाविकांसाठी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच अन्य मूलभूत सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने वारी सुरळीत, सुरक्षित आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. (Ashadhi Wari 2026)

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी