Devendra Fadnavis : संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी



मुंबई : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.


परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



सहयाद्री अतिथी गृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरण सिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ रूपये कोटी विकास आराखड्यामध्ये श्री संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे


अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रूपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते,पार्किंग, बगीचे,फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.



चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींची कामे


चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१.७५ कोटींच्या कामांमध्ये काटोल येथील भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, वाहनतळ, बगीचा, कमानी पूल, पाथवे आणि इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या विकासामुळे महानुभाव पंथाच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर