FIFA World Cup 2026 : फेरान टोरेसच्या ऐतिहासिक गोलने स्पेनला मिळवून दिला विश्वचषक

 FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर (Argentina) 1-0 असा थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. अतिरिक्त वेळेच्या 106 व्या मिनिटाला फेरान टोरेसने केलेला गोल स्पेनच्या विजयाचा निर्णायक क्षण ठरला. नियमित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. मात्र अतिरिक्त वेळेत स्पेनने आक्रमक खेळ करत अखेर सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवला.



या विजयी गोलाची सुरुवात युवा खेळाडू लॅमिन यामालच्या चतुर खेळीने झाली. यामालने उजव्या बाजूने चेंडू पुढे सरकवत पेड्रो पोरोकडे पास दिला. पोरोने बॉक्समध्ये अचूक क्रॉस टाकला. त्यानंतर निको विल्यम्सने हेडरद्वारे चेंडू फेरान टोरेसच्या दिशेने वळवला. योग्य वेळी मिळालेल्या या संधीचा फायदा घेत टोरेसने डाव्या पायाने जोरदार फटका मारला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ आणि बचावपटूंना चकवत चेंडू थेट जाळ्यात जाऊन धडकला.


टोरेस मैदानात सामन्याच्या दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून उतरला होता. त्याच्या गोलनंतर स्पेनच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. सामन्याच्या अखेरीस टोरेसने आणखी एकदा चेंडू जाळ्यात पाठवला होता, मात्र तो ऑफसाईड असल्याने तो गोल ग्राह्य धरला गेला नाही. ( FIFA World Cup 2026)



संपूर्ण सामन्यात स्पेनने वर्चस्व राखले. स्पेनने अनेक आक्रमणे करत अर्जेंटिनाच्या बचावफळीवर (Defence) सातत्याने दबाव ठेवला. दुसरीकडे अर्जेंटिनाला फारशा प्रभावी संधी निर्माण करता आल्या नाहीत. अखेर अतिरिक्त वेळेतील एका गोलच्या जोरावर स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले आणि फुटबॉलच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले.


Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये