Maharashtra Politics : मी बोललो, तर तटकरेंचे पितळ उघडे पडेल!

- गृहराज्यमंत्री योगेश कदम; तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद चिघळला


मुंबई : कोकणातील महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उडी घेतली असून, 'मी बोलायला लागलो, तर तटकरेंचे पितळ उघडे पडेल,' असा पलटवार त्यांनी केला आहे. तटकरे यांच्या वक्तव्यानंतर आता तडजोडीला कोणतीही जागा उरलेली नसून हा वाद मिटेल असे वाटत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Maharashtra Politics)



खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी बोलताना योगेश कदम म्हणाले की, "सुनील तटकरे यांनी जी भाषा वापरली आहे, त्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईजसाठी जागा राहिलेली नाही. आता हे मिटेल असे मला वाटत नाही. मी त्यांच्यावर तिखट बोलू शकतो आणि त्यांच्याबद्दल तिखट बोलणे म्हणजे सत्य बोलणेच ठरेल. परंतु, मला या विषयाच्या खोलात जायचे नाही." ( Ramdas Kadam)


मागच्या निवडणुकांमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत योगेश कदम यांनी तटकरेंना सूचक इशारा दिला. "मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये कोणी कोणाला मदत केली, याचे सत्य जर समोर आले, तर अनेकांचे पितळ उघडे पडेल," असे विधान त्यांनी केल्यामुळे महायुतीतील जुने वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Mahayuti)



नेमका वाद काय?


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, रामदास कदम ( Ramdas Kadam) यांनी तटकरेंवर जहरी टीका केली होती. "सुनील तटकरे जिथे जेवतील तिथेच छेद करतील, अशी त्यांची अवलाद आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे," असे विधान रामदास कदम यांनी केले होते.
- या विधानाला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी देखील अतिशय शेलक्या शब्दांचा वापर केला. "पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणेच बोलतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखवावे. आधीच मर्कट आणि त्यात दारू प्यायलेला, अशी त्यांची अवस्था झाली आहे," अशी टीका तटकरे यांनी केली होती.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला