Nashik KumbhMela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यामुळे विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप’ची संधी

Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela : १२ वर्षानंतर नाशिकमध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा न राहता याव्दारे स्थानिकांना देखील त्याचा लाभ व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आता अशी संधी विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होणार आहे. (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela)


नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (एसआयओएम) येथे आयोजित ‘सुशासन, अर्थव्यवस्था आणि कुंभ व्यवस्थापन’ या विशेष परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून यासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी, देशाच्या प्रगतीचे मोजमाप केवळ जीडीपी किंवा बाजारमूल्यावर न करता समाजातील संधी व संसाधनांचे समान वितरण कितपत झाले, यावरही केले गेले पाहिजे, असे सांगून ‘जिनी गुणांक’ या संकल्पनेचा संदर्भ देत समावेशक विकासाचे महत्त्व मांडले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात प्रसाद यांनी कुंभमेळा हा अध्यात्म, अर्थव्यवस्था आणि आधुनिक ऑपरेशन्स मॅनेजमेंट यांचा संगम असल्याचे सांगितले. (Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela)



तसेच कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर भागधारकांमधील प्रभावी समन्वय अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. संशोधन, सल्लागार प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्यक्ष प्रशासकीय आव्हानांवर काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना केले. जीआयएस, मॅटलॅब, एसपीएसएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशन यांसारख्या आधुनिक विश्लेषणात्मक साधनांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि सल्लागार प्रकल्पांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे नमूद केले.(Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela)



कुंभमेळ्यासाठी १२०० कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता


तर नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे सुरु आहे. अशातच राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला( Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela Authority ) १ हजार २०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आधी वेगात आणि उत्तम होण्यास मदत होणार आहे. नगरविकास विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हा निधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी वापरला जाणार आहे.


नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी मंजूर झाली आहे. या मंजूर तरतुदीतील १२०० कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये २८३ कोटी, डिसेंबर २०२५ मध्ये ७१७ कोटी, फेब्रुवारी २०२६ मध्ये ५०१ कोटी तर मे २०२६ मध्ये ३९६ कोटी असा एकूण १ हजार ८९७ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाला दिला आहे.

Comments
Add Comment

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.