Matheran Heritage Mini-Train : माथेरानच्या हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

माथेरान : ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची हेरिटेज मिनी ट्रेन आता हरित तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. हेरिटेज दर्जा लाभलेल्या या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनाची जोड देण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासह पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Matheran Heritage Mini-Train)


भारतीय रेल्वेने हेरिटेज रेल्वे मार्गांचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवत त्यांना आधुनिक आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हायड्रोजन फॉर हेरिटेज ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत देशातील निवडक हेरिटेज रेल्वे मार्गांसह नेरळ-माथेरान हिल रेल्वेचाही समावेश केला आहे. सध्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन डिझेल इंजिनावर धावते. भविष्यात हायड्रोजनवर चालणारे इंजिन कार्यान्वित झाल्यास धूर आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे. (Matheran Heritage Mini-Train)



पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या माथेरानसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, स्वच्छ ऊर्जा व शाश्वत पर्यटनाच्या दिशेने तो एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचे माथेरानचे ध्येय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्या, घनदाट जंगल आणि नागमोडी वळणांमधून धावणारी जगप्रसिद्ध नेरळ-माथेरान हेरिटेज मिनी ट्रेन; लवकरच या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता असून, हरित पर्यटन आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. (Matheran Heritage Mini-Train)



व्हिडिओ गॅलरी ऍक्सेस :


हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर माथेरानच्या मिनी ट्रेनलाही अशाच तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याने पर्यटक, स्थानिक नागरिक आणि रेल्वेप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, माथेरानच्या मिनी ट्रेनवर हायड्रोजन इंजिन नेमके कधी धावणार, याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे 'माथेरानची राणी' हरित ऊर्जेवर धावताना पाहण्याची प्रतीक्षा आता पर्यटकांसह सर्व रेल्वेप्रेमींना लागली आहे. (Matheran Heritage Mini-Train)

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये