Rajya Sabha Members : राज्यसभेच्या नवनिर्वाचित ९ सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी राज्यसभेच्या ९ नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.यापैकी पाच सदस्यांनी हिंदीत, दोन सदस्यांनी इंग्रजीत तर दोन सदस्यांनी बंगालीत शपथ घेतली. (Rajya Sabha Members)



राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये गुजरातमधील भाजपचे मुकेशभाई जे. राठवा, कर्नाटकमधील काँग्रेसचे पवन खेडा, मध्य प्रदेशातील भाजपचे महेश केवट, मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे जेम्स पांगसांग कोंगकल संगमा, मिझोरममधील खिआंगते लालटलुआंगकिमा, राजस्थानमधील भाजपचे डॉ. सतीश पूनिया तसेच पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रकाश चिक बराईक, सुश्मिता देव आणि सुखेंदू शेखर रे यांचा समावेश आहे. (Rajya Sabha Members)



संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित :


मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळामुळे अनेक वेळा तहकूब करण्यात आले. अखेर राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत आणि लोकसभेचे कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवार २१ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले. (Rajya Sabha Members)

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली