Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी डॉलर) किमतीचा हिरा चोरण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन भारतीय नागरिकांपैकी पहिल्या आरोपीला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



या प्रकरणात 41 वर्षीय मंगरोलिया मनोजकुमार कुरजीभाई याने चोरीचा गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन वर्षे, दोन महिने आणि दोन आठवड्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तर त्याचा साथीदार, 30 वर्षीय सेरासिया मिलन रामनीकभाई याच्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. हे दोघे भारतीय नागरिक एका समान मित्रामार्फत एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि सोशल पासवर सिंगापूरला आले होते. सिंगापूरला येण्यापूर्वी त्यांनी सुरतमध्ये एक बनावट हिरा तयार करून घेतला होता. हा बनावट हिरा मूळ हिऱ्याच्या आकारमान आणि सीरियल नंबरशी तंतोतंत जुळणारा बनवण्यात आला होता. मात्र, त्यांना मूळ हिऱ्याची ही माहिती आधीपासून कशी मिळाली, याचा उल्लेख न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नाही. त्यांची योजना अशी होती की मंगरोलिया दुकानातील विक्री व्यवस्थापकाचे लक्ष विचलित करेल आणि मिलन आपल्या तोंडात लपवून ठेवलेल्या बनावट हिऱ्याच्या मदतीने खऱ्या हिऱ्याची अदलाबदल करेल.



दोन्ही आरोपी 19 जून 2026 रोजी सिंगापूरमध्ये दाखल झाले. त्यांचा उद्देश चायनाटाउनमधील ‘डायनोचे’ या दागिन्यांच्या दुकानातून 4.95 कॅरेटचा मौल्यवान हिरा चोरण्याचा होता.


दुपारी सुमारे 3 वाजता ते दुकानात गेले आणि हिरा पाहण्याची विनंती केली. मंगरोलियाने विक्री व्यवस्थापकाला दुकानातील इतर वस्तू दाखवण्यास सांगून त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले. त्याचवेळी त्याच्या इशाऱ्यावर मिलनने तोंडातून बनावट हिरा काढून खऱ्या हिऱ्याशी त्याची अदलाबदल केली. त्याने खरा हिरा आपल्या तोंडात लपवून ठेवला. मात्र, त्याची ही संपूर्ण कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर दोघांनी ‘खरेदीबाबत विचार करू’ असे सांगून दुकान सोडले. आरोपी गेल्यानंतर विक्री व्यवस्थापकाने मशीनद्वारे तपासणी केली असता हिरा बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर दोघेही त्यांच्या हॉटेलमध्ये परतले, नियोजित वेळेपूर्वी चेक-आउट केले आणि भारतासाठी विमानाचे तिकीट बुक केले. मात्र, त्याच रात्री सुमारे 8.50 वाजता चांगी विमानतळाच्या टर्मिनल 3 येथे इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान त्यांना अटक करण्यात आली. मिलनच्या बॅगेतून खरा हिरा जप्त करण्यात आला.



सरकारी वकील यिप चेंग यी यांनी न्यायालयात सांगितले की, हा एक पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक आखलेला गुन्हेगारी कट होता. दोन्ही आरोपी केवळ हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने सिंगापूरमध्ये आले होते. मंगरोलियाने दुभाष्याच्या माध्यमातून न्यायालयाकडे कमी शिक्षेची विनंती केली. त्याने भारतात त्याची दोन मुले असल्याचे सांगितले. या गुन्ह्यासाठी कमाल सात वर्षांच्या कारावासाची तसेच दंडाची तरतूद आहे.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये