Pune News : नाणेघाटात पर्यटनाला गेलेल्या 22 वर्षीय युवकाचा दरीत पडून मृत्यू; दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह सापडला

पुणे : पुणे  (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या नाणेघाट येथे पर्यटनासाठी गेलेल्या 22 वर्षीय युवकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सलग दोन दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी बचाव पथकाला युवकाचा मृतदेह दरीत आढळून आला. खराब हवामान आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्य मोठे आव्हान ठरले होते. (Naneghat)


मृत युवकाची ओळख दत्ता विनायक लोंढे (वय 22) अशी झाली असून तो आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे गावचा रहिवासी होता. दत्ता आपल्या तीन मित्रांसह नाणेघाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी दाट धुक्यामुळे परिसरातील दृश्यता कमी झाली असताना कड्याजवळ फिरताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)



घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र मुसळधार पाऊस, घसरडे कडे आणि दाट धुके यामुळे शोधकार्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी युवकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. मोबाईलवर रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेने शोधमोहीम वाढवण्यात आली. (Rescue Opration)


सोमवारी अधिकृत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधकार्याला वेग आला. अखेर आज सकाळी दरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. (Naneghat Accident)



पावसाळ्यात नाणेघाट येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र या काळात दाट धुके, निसरडे कडे आणि खोल दऱ्यांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फी काढताना किंवा साहसी प्रकार करताना खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News)



Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी