Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारानंतर त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ब्लॉगमधून दिली आहे. (Amitabh Bachchan)


अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, शस्त्रक्रियेनंतर अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, रुग्णालयातून घरी आल्यानंतरचा काळ हा सर्वात आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावरण्यासाठी वेळ लागतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ( Amitabh Health Update)



मात्र, त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली किंवा कोणत्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Bollywood)


82 वर्षीय अमिताभ बच्चन आजही चित्रपट, जाहिराती आणि 'कौन बनेगा करोडपती' (KBC) सारख्या कार्यक्रमांमधून सक्रिय आहेत. तसेच ते नियमितपणे ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी ते FIFA स्पर्धेतील सामन्यांबाबतही नियमित पोस्ट करत होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. (Entertainmnet News)



सध्या अमिताभ बच्चन घरी विश्रांती घेत असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामात रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Bollywood News)



Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ