Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता


मुंबई : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि प्रशासकीय चौकटीत तब्बल पाच दशकांनंतर बदल घडवून आणण्यात आला आहे. महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रूल्स - आर. आर.) लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सन १९७७ नंतर पहिल्यांदाच झालेल्या या व्यापक बदलांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता कायमचे मार्गी लागणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. (Chandrashekar Bawankule)



मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागाच्या नवीन आकृतीबंधाला आणि सेवाप्रवेश नियमावलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे. १९७७ नंतर म्हणजेच तब्बल ५० वर्षांनंतर महसूल रचनेत हा बदल घडवण्यात आला आहे. या निर्णयामुळे विभागातील सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होऊन प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा व पारदर्शकता येईल.



दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) अधिकारी आणि चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) गैरव्यवहाराच्या आरोपांवर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, एसआरएमध्ये वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाईल. यातील नगरविकास विभागाशी संबंधित तक्रारींची चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, तर महसूल विभागाशी संबंधित चौकशी स्वतः महसूल विभाग करेल आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.(Chandrashekar Bawankule)



राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन


विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका हा लोकशाहीचा भाग असला तरी देशातील १४० कोटी जनतेने मोदींना सलग तिसऱ्यांदा कौल दिला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तसेच 'नीट' परीक्षा गोंधळाचा उल्लेख करत बावनकुळे यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनावर टीका केली. पेपरफुटीच्या घटनेनंतर सरकारने तातडीने त्रुटी दूर करून स्वतःहून कठोर पावले उचलली आहेत. असे असतानाही तरुणांना भडकवण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी दगडफेकीसाठी दगड गोळा केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या या षड्यंत्राची व असामाजिक तत्त्वांची सखोल चौकशी सुरू असल्याचेही महसूलमंत्र्यांनी नमूद केले.(CJP Protest)

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक