Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव कार्य उभारणाऱ्या ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’ला (NDRF) पुणे जिल्ह्यात कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी मावळ तालुक्यातील तीन हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत पुण्यातील या तळासह नागपुरात नवीन शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करणे, १७७ तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवणे आणि लोकायुक्त कार्यालयाच्या मनुष्यबळात वाढ करणे यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.



पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता. मावळ) येथील तीन हेक्टर जमीन 'एनडीआरएफ'ला उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी संस्थेचा कायमस्वरूपी तळ साकारणार आहे. या विस्तारामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन स्थितीत जलद व प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यासोबतच, विदर्भातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला' संलग्न नवीन शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वार्षिक १२० प्रवेश क्षमता असलेल्या या महाविद्यालयासाठी ५१ नियमित पदांना मान्यता देण्यात आली असून, यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया उद्योगातील संशोधनाला मोठी गती मिळणार आहे.



ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यासाठी राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सन २०२६-२७ साठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’ राबवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी प्रत्येक तालुक्याला ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून सन २०२७-२८ मध्ये यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कृत केले जाईल. याशिवाय, 'महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम २०२३' मुळे वाढलेल्या अधिकारक्षेत्राचा विचार करून लोकायुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. तसेच, मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्या नागपूरमधील सुभाष रोडवरील जागेच्या भाडेपट्ट्यावरील नूतनीकरणाचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णयही महसूल विभागाने घेतला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी