CM Devendra Fadnavis : दिल्लीतील आंदोलनाआडून काहींचा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; 'नीट' परीक्षेशी देणेघेणे नसलेले अनेकजण आंदोलनात


मुंबई : दिल्लीत ‘नीट’च्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशात अराजकता पसरवण्याचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे नमूद करतानाच या आंदोलनात शिरलेल्या अनेक लोकांना ‘नीट’ परीक्षा काय आहे किंवा ती कधी झाली, याची साधी माहितीही नाही, असा टोला त्यांनी लगावला. (CM Devendra Fadnavis)



मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि परवानगी घेऊन केलेल्या आंदोलनांना सरकार नेहमीच सहकार्य करते. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलने करणे, हिंसेचा मार्ग अवलंबणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. दिल्लीतील आंदोलनाला कोणतेही स्पष्ट नेतृत्व नसल्यामुळे काही असामाजिक प्रवृत्तींनी त्याचा गैरफायदा घेतला. पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली नसती, तर तिथे मोठा अनर्थ घडला असता. या आंदोलनात सर्वच लोक वाईट हेतूने आले आहेत असे नाही, काही नागरिक चांगल्या भावनेने सहभागी झाले असले, तरी ज्या राजकीय पक्षांना जनतेने नाकारले आहे ते पक्ष आणि काही संघटना अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा वापर करत असल्याचे चित्र उघड झाले आहे.( NEET Protest)



दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारित एका विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दादांचे लहानपण, कुटुंब आणि राजकीय कारकीर्द दर्शवणारे हे प्रदर्शन अत्यंत भावूक आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमाच्या वेळी बोलताना, शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत विचारले असता, सहकार विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ( Delhi Protest)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा