Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने आवश्यक उपाययोजना राबवल्या असून, मंत्रालयातील पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फतही पाण्याची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती विभागाने दिली आहे. (Mantralaya Water)



पाण्याच्या ३० टाक्यांची संपूर्ण स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ जुलै २०२६ रोजी मंत्रालयातील जमिनीखालील पाण्याची टाकी तसेच मुख्य आणि विस्तार इमारतींवरील एकूण ३० पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण साफसफाई केली. यापुढे सर्व टाक्यांची दर १५ दिवसांनी नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (Mantralaya Water)



BMCच्या प्रयोगशाळेचा अहवाल; पाणी पिण्यास योग्य : 


मंत्रालयातील पाण्याचे नमुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. २९ एप्रिल २०२६ आणि १० जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. याशिवाय, महापालिकेने मंत्रालयात येणाऱ्या पाण्याचे तसेच जमिनीखालील आरसीसी टाकीमध्ये साठवलेल्या पाण्याचे नमुने तपासले असून, १० जुलैच्या अहवालानुसार हे पाणीही सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



३३ वॉटर प्युरिफायरचे सर्व्हिसिंग पूर्ण :


पाणीपुरवठ्याची गुणवत्ता अधिक चांगली ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ३३ जलशुद्धीकरण यंत्रणांचे (वॉटर प्युरिफायर) सर्व्हिसिंग पूर्ण करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



तज्ज्ञ समितीकडून स्वतंत्र तपासणी सुरू :


पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ११ जुलै २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १३ जुलै रोजी मंत्रालयातील जमिनीखालील टाकी, टेरेसवरील टाक्या तसेच मुख्य आणि विस्तार इमारतीतील प्रत्येक मजल्यावरील पाण्याचे नमुने सलग तीन दिवस संकलित केले असून, त्याचा सविस्तर अहवाल लवकरच अपेक्षित आहे. (Mantralaya Water)



प्रसाधनगृहांचीही नियमित स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले की, मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ८८ प्रसाधनगृहांची स्वच्छता नियुक्त कंत्राटदारामार्फत निश्चित वेळापत्रकानुसार दररोज नियमितपणे केली जात आहे. मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि महापालिकेच्या अहवालामुळे पाणीपुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, स्वतंत्र तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mantralaya Water)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा