Ankita Walawalkar : "मी CJP ला पाठिंबा देत नाही तर मी..."; बिग बॉसफेम अंकिता वालावलकरने घेतली स्पष्ट भूमिका

मुंबई : सोशल मीडिया रिल्स क्रिएटर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) आपल्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी आपण आवाज उठवत आहोत, मात्र त्याचा कोणत्याही संघटनेशी किंवा राजकीय विचारधारेशी संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले.


सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने (Ankita Walawalkar) सांगितले की, "माझा पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षणव्यवस्थेला आहे. कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नव्हे. मी CJP ला पाठिंबा देत नाही."



अलीकडील काही घडामोडींनंतर सोशल मीडियावर तिच्या भूमिकेबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. त्यानंतर तिने स्वतः पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अंकिताने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, यासाठी आपण सातत्याने भूमिका घेत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यांना पाठिंबा देणे म्हणजे कोणत्याही विशिष्ट संघटनेचे समर्थन करणे असा त्याचा अर्थ होत नाही, असे तिने स्पष्ट नमूद केले. (Ankita Walawalkar)


तिच्या (Ankita Walawalkar) या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी तिच्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले आहे, तर काही जण या विषयावर आपापली मते व्यक्त करत आहेत.



दरम्यान, अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) या वक्तव्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना नवे वळण मिळाले असून, त्यांनी कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक भूमिकेपेक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेलाच आपला पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’