Ajit Pawar Birthday : अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


"एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू..."; अजितदादांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली



दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अत्यंत भावनिक शब्दांत आदरांजली वाहिली आहे. 22 जुलै हा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख असा संमिश्र भावनांनी भरलेला दिवस असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (Ajit Pawar Birthday)



एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन आजचा दिवस आला आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, परंतु त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालून सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. (Eknath Shinde)


अजितदादांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना शिंदे म्हणाले की, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते, वक्तशीरपणा, दिवसातील प्रत्येक क्षण जनतेसाठी खर्च करणे आणि प्रशासनावर प्रभावी पकड ठेवणे याचे धडे दादांनी संपूर्ण राजकीय पिढीला दिले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प, शेती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रावरील त्यांचा सखोल अभ्यास महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.



महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची अनेक स्वप्ने आम्ही सोबत पाहिली होती, परंतु नियतीने दादांना आपल्यातून अकाली हिरावून नेले. त्यामुळे त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल. महायुतीमधील सहकार्य आणि विकासाची दृष्टी कायम ठेवत एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.



Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे