Babasaheb Patil : अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा; ६ जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांचे कर्ज माफ


मुंबई (Mumbai): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ जिल्ह्यांतील निवडक ५०० पात्र लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस संदेश पाठवले जाणार असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली.


राज्य मंत्रिमंडळाच्या २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी शासन निर्णयात सुधारणा करत योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक करण्यात आली. या योजनेसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB), १२ राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती ‘महाआयटी’द्वारे विकसित पोर्टलवर अपलोड केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सर्व खात्यांचे लेखापरीक्षण सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून पूर्ण करण्यात आले आहे.


बनावट किंवा अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळू नये यासाठी प्रशासनाने कठोर निकष लागू केले आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती, तसेच डीसीसीबी, नागरी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व बाजार समित्यांचे पदाधिकारी-कर्मचारी यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. संबंधित संस्थांकडून अपात्र घटकांची माहिती पोर्टलवर संकलित करून संगणकीय प्रक्रियेद्वारे केवळ पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.


निवडलेल्या सर्व ५०० शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था (VKSS) आणि बँक शाखांच्या फलकावर प्रसिद्ध केली जाईल. पात्र शेतकऱ्यांना एक ‘विशिष्ट क्रमांक’ (Unique ID) दिला जाईल. शेतकर्‍यांना आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मधून आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असेल. त्यासाठी राज्यभरात राज्यातील ३२ हजार आपले सरकार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे.


सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया ३१ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय