Thane Crime : त्याने तिला लॉजवर नेलं... अन् घडल भयंकर; 4 वर्षाच्या प्रेमाला एका क्षणात संपवलं

ठाणे : ठाण्यातील एका लॉजमध्ये तरुणीची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुण-तरुणीचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, एका वादानंतर प्रियकराने तरुणीचा जीव घेतल्याचा आरोप असून, ठाणे नगर पोलिसांनी अवघ्या 2 तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Thane Crime)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या म्हस्के ही तरुणी भांडुप येथे राहत होती, तर नंदकिशोर गाडेकर (वय 27) हा डोंबिवलीतील विष्णूनगर परिसरातील रहिवासी आहे. दोघांची काही वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ते एकमेकांच्या सतत संपर्कात होते आणि अधूनमधून भेटतही असत. ( Lodge Murder)



गुरुवारी रात्री दोघे ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजा हॉटेल लॉजमध्ये आले होते. रात्री साडे 9 वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच वादातून आरोपीने उशीने तरुणीचे तोंड दाबून तिची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


घटना घडल्यानंतर आरोपी एकटाच खोलीतून बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने खोलीला कुलूप लावले. तरुणी बाहेर न आल्याने आणि आरोपी एकटाच निघून गेल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोली उघडून पाहिली असता तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.



घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणीची तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. घटनेनंतर अवघ्या 2 तासांत नंदकिशोर गाडेकर याला ताब्यात घेण्यात आले. (Crime News)


या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांमधील वादाचे कारण आणि इतर बाबींचा ठाणे नगर पोलीस सखोल तपास करत आहेत.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण