ICC Ranking : आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये मोठा ट्विस्ट! रोहित-विराटला होणार फायदा ?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदने बुधवारी २२ जुलै २०२६ रोजी एकदिवसीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल अव्वल स्थानावर आहे, मात्र नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेमुळे त्याचे अव्वल स्थान धोक्यात आले होते. (ICC Ranking )



या मालिकेपूर्वी शुभमन गिल क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता. त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत तीन सामन्यांमध्ये १८८ धावा केल्या. मात्र, फक्त एक रेटिंग पॉइंटने त्याचे अव्वल स्थान हुकले आहे. गिलचे एकूण रेटिंग पॉइंट्स ८०१ आहेत, तर डॅरिल मिचेल ८०२ पॉइंट्ससह अव्वल स्थानावर आहे.



या क्रमवारीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग पॉइंट्स ७६७ आहेत, तर रोहित ७५८ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. तसेच इंग्लंडचा फलंदाज जो रूटने टॉप-१० मध्ये पुनरागमन केले आहे. भारताविरुद्धच्या तीनही सामन्यांत तो बाद झाला नाही. त्याने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक २४९ धावा केल्या. यामुळेच त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला असून, थेट चार स्थानांची झेप घेत त्याने टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. बेन डकेट (११ स्थानांनी वर चढून संयुक्तपणे १९ व्या स्थानावर) आणि जेकब बेथेल (पाच स्थानांनी वर चढून ६४ व्या स्थानावर) यांनी वनडे फलंदाजांच्या यादीत प्रगती केली आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेल (सहा स्थानांनी वर चढून ५४ व्या स्थानावर) आणि मार्क चॅपमन (१० स्थानांनी वर चढून ६३ व्या स्थानावर) या दोघांनाही फलंदाजी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. (ICC Ranking )



गोलंदाजीच्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरने या मालिकेत चांगली गोलंदाजी करत क्रमवारीत एक स्थान वरची झेप घेतली आहे. तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत भारताचा एकही गोलंदाज नाही. अष्टपैलूंच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमरजाई पहिल्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा मेहेदी हसन मिराज दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत भारताकडून अक्षर पटेल नवव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त