Ahilyanagar : हॉटेलमध्ये अनैतिक व्यापार, पोलिसांना खबर मिळताच मोठी कारवाई, थेट....

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन हॉटेलमध्ये अनैतिक व्यापार सुरु असल्याच्या कारणातून दोन हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिम आणि काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे पोलिस अहवालातून निदर्शनास आल्याने दोन्ही हॉटेलला कुलूप लावण्यात आले. श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे. (Ahilyanagar Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या (Shrigonda Police Station) पोलिस निरीक्षकांनी या कारवाईबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्ये गुजरात,आसाम तसेच महाराष्ट्रातील सात महिलांना पैशाचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. त्यांना हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार करण्यात येत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हॉटेलचालक व मालक किरण रावसाहेब जरे आणि सुनील नाना पठारे यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)



हॉटेल मालकाचा वेगळाच दावा


संबंधित हॉटेलवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सांगितले की जागा भाडेकराराने दिली असून, तेथे अनैतिक व्यापारास परवानगी दिलेली नसल्याचा, तसेच आजारपणामुळे बाहेरगावी असल्याने या प्रकाराची माहिती नसल्याचा दावा हॉटेल मालकाने केला होता. सध्या हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी भोजनाची सुविधा असून, कारवाई झाल्यास कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. (Ahilyanagar Crime News)



जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठीच


मात्र, पोलिस विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.



अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली येथे मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश असून, रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते व किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्धही श्रीगोंदा पोलिस ठाण्यात (Shrigonda Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Greater Noida News : ग्रेटर नोएडामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नूडल्स खाल्ल्याने फूड पॉइजनिंगचा प्राथमिक संशय!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौकात महावितरणच्या कार्यालयाला आग, फर्निचर आणि कागदपत्रांचे नुकसान

Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील एका

Gardening Tips: घरच्या घरी उगवा ताज्या भाज्या आणि फळं; जाणून घ्या भन्नाट पद्धत

[caption id="attachment_1067170" align="alignnone" width="850"] घरात झाडं लावण्याची इच्छा अनेकांना असते. मात्र, माती घाण होण्याची , मोठ्या कुंड्या

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH)

पनवेलमध्ये पहिली नागरी बस सेवा सुरू होणार, २८८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकांच्या

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट ! हॉटेल, लॉज आणि वाहन बाजारांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा राष्ट्रपतींचा नाशिक दौरा लक्षात घेता शहर पोलिसांनी