ISRO Recruitment 2026 : ISRO मध्ये थेट भरती! ४६२ अप्रेंटिस पदांसाठी २५ जुलैला थेट 'वॉक-इन इंटरव्यू'

तिरुवनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) द्वारे तब्बल ४६२ अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी थेट वॉक-इन इंटरव्यू (Walk-in Interview) आयोजित करण्यात आला आहे. यासाठी कोणत्याही कठीण परीक्षेची गरज नसून, उमेदवारांना २५ जुलै २०२६ रोजी मूळ कागदपत्रांसह ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे.


या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ४६२ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये:


ग्रॅज्युएट अप्रेंटिस: २७३ पदे


टेक्नीशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: १८९ पदे



निवड प्रक्रिया कशी असेल?


विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मधील या पदांसाठी उमेदवारांची निवड खालील निकषांच्या आधारे केली जाईल:१. शैक्षणिक गुण (Academic Marks): उमेदवारांच्या पदवी किंवा डिप्लोमाच्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग.


२. पात्रता निकष: आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता.


३. कागदपत्र पडताळणी (Document Verification).



महत्त्वाची अट :


वॉक-इन इंटरव्यू प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी उमेदवारांनी NATS (National Apprenticeship Training Scheme) या अधिकृत पोर्टलवर नोंदणी (Registration) करणे अनिवार्य आहे. NATS वर नोंदणी नसलेल्या उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार नाही.



आवश्यक कागदपत्रे (Required Documents)



  • मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी सर्व ओरिजनल कागदपत्रे आणि त्यांची स्व-साक्षांकित (Self-Attested) छायाप्रत (Photocopy) सोबत ठेवणे आवश्यक आहे:

  • संबंधित इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र.

  • वयाच्या पुराव्यासाठी १० वीची मार्कशीट किंवा जन्म दाखला.

  • अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो.

  • अनुभव प्रमाणपत्र (मागितले असल्यास).

  • जातीचा दाखला: SC/ST उमेदवारांसाठी वैद्य जातीचे प्रमाणपत्र.

  • OBC प्रमाणपत्र: केंद्र सरकारच्या नमुन्यातील व्हॅलिड 'नॉन-क्रिमी लेयर' प्रमाणपत्र.

  • EWS प्रमाणपत्र: आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र.

  • PwBD (दिव्यांग) प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकरणाने दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.


मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख


दिनांक: २५ जुलै २०२६


ठिकाण: VSSC पॅव्हेलियन, कार्तिका थिरुनल गव्हर्नमेंट व्होकेशनल अँड हायर सेकंडरी स्कूल फॉर गर्ल्स, तिरुवनंतपुरम, केरळ.


इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.

Comments
Add Comment

Panama City : पनामात भूकंपाचा महाप्रलय! ७.७ तीव्रतेच्या धक्क्यानंतर अमेरिकेकडून ९ देशांना त्सुनामीचा हाय अलर्ट

मध्य अमेरिकेतील पनामा देशाच्या किनारपट्टीवर शुक्रवारी रात्री एक अत्यंत भयानक नैसर्गिक आपत्ती ओढवली. रिश्टर

Saharanpur Accident : सहारनपुरमध्ये काळाचा घाला! शाकुंभरी देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कंटेनरची धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर जखमी

उत्तर प्रदेश : नवरात्रीच्या आनंदावर विरघळवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधून समोर आली

CISF Investigation : जम्मू-काश्मीरमध्ये CISF जवानाचा गोळी लागून मृत्यू; चौकशीचे आदेश, नेमकं कारण काय?

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाचा गोळी लागून

Mumbai Crime Branch : बेकायदेशीर CDR, SDR अन् मोबाईल लोकेशन देणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; २ पोलिसांसह ५ जण गजाआड!

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), सबस्क्रायबर डिटेल्स रेकॉर्ड्स (SDR) आणि मोबाईल

'सायबरटेक एशिया'चे पहिल्यांदाच भारतात आयोजन; जागतिक सायबर सुरक्षा परिषद कधी, कुठे असेल?

मुंबई: सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या ‘सायबरटेक एशिया’चे

Uttar Pradesh Viral Video : शाळकरी विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला 'तबला'; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई!

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या अजब आणि अशोभनीय वर्तनाचा प्रकार