Sonam Wangchuk : सोनम वांगचुक उपोषण सोडण्याची सशर्त तयारी

नवी दिल्ली : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे. याच मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील दिल्लीत बेमुदत उपोषणाला बसलेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पण तरीही सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अद्याप त्यांचे उपोषण सोडलेले नाही. या दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून दिल्लीत चांगलेच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या घडामोडीवरून सोनम वांगचुक यांनी एका पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी हमी मिळावी. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह नीट पेपर फुटीच्या मुद्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची हमी मिळावी.कारण सरकार केवळ माझ्याच नव्हे, तर लाखो भारतीय तरुणांच्या आशा-आकांक्षांकडेही लक्ष देत आहे याची मला खात्री पटेल. असे आश्वासन न मिळाल्यास, मला माझे उपोषण अनिश्चित काळासाठी सुरू ठेवावे लागेल , असे सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी म्हटलं आहे.



तरुणाईचा विश्वास परत मिळवा, विरोधकांच्या ‘षडयंत्रा’ची पोलखोल करा : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एनडीएच्या बैठकीत खासदारांना तरुणांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. विरोधी पक्ष उगाच विद्यार्थ्यांमध्ये 'भीती' पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्या असे पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पेपरफुटीत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेही पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले. तरुणांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे. पेपरफुटीमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु फेरपरीक्षा कोणत्याही अनियमिततेशिवाय पार पडली. आणि पेपरफुटीत सामील असलेल्यांना कठोरतम शिक्षा मिळावी, हे सर्वोत्तम आणि नामांकित वकिलांनी सुनिश्चित केले पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात यायला हवे की त्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल आणि पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. टोळ्यांच्या धोक्यापासून कोणतेही राज्य प्रभावित होण्यावाचून राहिलेले नाही आणि त्यापैकी प्रत्येकाला न्याय मिळवून दिला जाईल, हे सुनिश्चित करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.



संवादातून तोडगा काढण्याचे अण्णा हजारे यांचे आवाहन : 


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पत्रात त्यांनी आंदोलकांशी बळाचा वापर टाळत, सकारात्मक आणि संवेदनशील संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन सरकारला केले आहे. अण्णा हजारेंनी आपल्या पत्रात संवादातून तोडगा काढण्याच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला असहमती नोंदवण्याचा अधिकार आहे. आंदोलकांशी संवाद साधून प्रश्न सोडवणे हाच योग्य मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दिल्लीतील निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी वेदना व्यक्त केल्या असून, सरकार आणि आंदोलक दोघांनीही हिंसाचार टाळला पाहिजे. नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांमधील अस्वस्थतेकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. आपला देश महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या विचारांचा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा वारसदार आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे.मात्र त्यांचे निराकरण संवाद, संवेदनशीलता आणि परस्पर आदराच्या माध्यमातूनच व्हायला हवे. शासनाने संयम, सहिष्णुता आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवावे, हीच अपेक्षा आहे. आपण या घटनेची गांभीयनि दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून लोकशाही मूल्यांना बळकटी द्याल, अशी अपेक्षा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.