T20 Series: झिम्बाब्वे दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीसमोर इतिहास रचण्याची संधी; ११ षटकारांनी होऊ शकतो विश्वविक्रम



 T20 Series : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांत त्याला केवळ ४२ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे आगामी मालिकेत मोठी खेळी करून स्वतःला सिद्ध करण्याचे त्याच्यासमोर मोठे आव्हान आहे. (T 20 Series)

झिम्बाब्वेविरुद्ध ( Zimbabwe Tour) २३, २५ आणि २६ जुलै रोजी हरारे येथे होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत वैभवकडे एक मोठा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत १५० षटकार पूर्ण करणारा फलंदाज बनण्यासाठी त्याला या मालिकेत आणखी ११ षटकारांची गरज आहे. सध्या त्याच्या नावावर ३७ डावांत १३९ षटकारांची नोंद आहे.



सध्या हा विक्रम संयुक्त अरब अमिरातीचा फलंदाज मोहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने ६६ डावांत १५० षटकारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा एविन लुईस (७० डाव) आणि ख्रिस गेल (७२ डाव) यांचा क्रमांक लागतो. वैभवने या मालिकेत ११ षटकार मारले, तर तो अवघ्या ४० डावांत १५० षटकार पूर्ण करत या दिग्गजांना मागे टाकू शकतो. ( Vaibhav Suryavanshi)



इंग्लंड दौऱ्यानंतर वैभवने आपल्या खेळातील कमतरता दूर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. राजस्थान रॉयल्सच्या सराव शिबिरात त्याने शॉर्ट बॉलविरुद्ध फलंदाजीवर अधिक भर दिला. इंग्लंडमध्ये तो अनेकदा अशाच चेंडूंवर बाद झाला होता. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात त्याच्या या तयारीचा किती फायदा होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (World Record)

सामनाचे वेळापत्रक 



























सामना  तारीख   स्थळ     वेळ (IST)
पहिला टी२० आंतरराष्ट्रीय   २३ जुलै, २०२६ (गुरुवार) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी ४:३० वाजता
दुसरा टी२०     २५ जुलै, २०२६ (शनिवार)   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी ४:३० वाजता
तिसरा टी२० आंतरराष्ट्रीय  २६ जुलै, २०२६ (रविवार)   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी ४:३० वाजता

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिन्ही टी-२० सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जाणार असून सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता सुरू होतील. या मालिकेत वैभव सूर्यवंशीची कामगिरी आणि संभाव्य विश्वविक्रम हे भारतीय चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

 

 

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून