Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी

वृंदावन : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर प्रेमानंद महाराजांची (Premanad Maharaj) भेट घेतली. कोहली आज म्हणजेच बुधवार २२ जुलै रोजी पत्नी अनुष्का शर्मासोबत वृंदावनला (Vrindavan) पोहोचला, जिथे त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यापूर्वी आयपीएल २०२६ संपल्यानंतर कोहलीने प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. हे सर्वश्रुत आहे की त्या हंगामात आरसीबीने विजेतेपद पटकावले होते.



कोहली आणि अनुष्का (Virushka) राधा केली कुंज आश्रमात अनवाणी चालताना दिसले आणि त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. ऑनलाइन फिरणाऱ्या अनेक व्हिडिओंमध्ये हे जोडपे कडेकोट सुरक्षेत आश्रमात पोहोचताना दिसत आहे. अनुष्का आणि विराट दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. आश्रमातून निघताना विराट आणि अनुष्का हातात प्रसाद घेऊन चिखलाच्या रस्त्यावरून अनवाणी चालले.



अनुष्काने प्रेमानंद महाराजांच्या (Premanad Maharaj) दर्शनासाठी साधा पांढरा सलवार-सूट परिधान केला होता, तर विराट टी-शर्ट आणि पँटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यापूर्वी, ते दोघे आश्रमाच्या परिसरात फिरताना दिसले. कोहली आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, वृंदावनमध्ये, (Vrundavan) लोकांनी त्यांना पाहताच कोहली आणि अनुष्काचे फोटो काढायला सुरुवात केली.




Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव