T20 Series : झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान!

टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्याच्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. (Team India)



श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही. आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 ने गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धही भारताला 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंड दौऱ्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने खेळलेल्या 7 टी-20 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवलेला नाही. (Shreyas Iyer)


यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत विजयाचे खाते उघडणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी, तर तिसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक 4 वाजता होईल. (India Vs Zimbabwe)



ही मालिका युनायडेट स्पोर्ट (Unite8 Sports) वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. तसेच फॅन कोड (FanCode) वर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. डीडी फ्री डिश वापरणाऱ्या प्रेक्षकांना डीडी स्पोर्ट्सवरही सामने पाहता येतील. (T 20 Series)


या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) कर्णधारपदाची जबाबदारी असताना वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma), तिलक वर्मा (Tilak Varma), इशान किशन (Isan Kisan), शिवम दुबे (Shivam Dube), रिंकू सिंग (Rinku Shingh), प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh), मयंक यादव (Mayak Yadhav), रवि बिष्णोई (Ravi Bishnoi) यांच्यासह इतर खेळाडूंना आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. ( IND vs ZIM)


Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून