Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा


मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे ०९ जुलै २०२६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटांसह मोठी भरती येणार असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा असे एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. जमा करण्यात आलेल्या या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.(Mumbai News)



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. स्वच्छता कामांचे नियमित नियोजन, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा तात्काळ हटविण्यासाठी यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळाची प्रभावी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. या व्यापक स्वच्छता उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.



मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राहावेत, यासाठी महानगरपालिका सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. विशेषतः मान्सून काळात भरती - ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने तो तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचऱ्याचे संकलन व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे कार्य करत आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्‍या स्वच्छतेकामी नागरिकांचाही सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे,असे आवाहन महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.(Mumbai)





  1. ९ जुलै ते दिनांक १९ जुलै २०२६ या कालावधीतील कचरा विल्हेवाट

  2. १.१ किलोमीटर लांबीच्‍या गिरगाव चौपाटी येथून ३३.६६ मेट्रिक टन,

  3. ५ किलोमीटर लांबीच्‍या दादर - माहीम समुद्रकिनारा १५२.१० मेट्रिक टन,

  4. ३.५ किलोमीटर लांबीच्‍या चिंबई - वारिंगपाडा समुद्रकिनारा १२७.२० मेट्रिक टन,

  5. ८ किलोमीटर लांबीच्‍या मढ - मार्वे समुद्रकिनारा ४४. २८ मेट्रिक टन,

  6. ६ किलोमीटर लांबीच्‍या जुहू समुद्रकिनारा १,८२५ मेट्रिक टन,

  7. ४.५ किलोमीटर लांबीच्‍या वेसावे समुद्रकिनारा येथून २७७.६० मेट्रिक टन

  8. सरासरी ७ किलोमीटर लांबीच्‍या गोराई समुद्रकिनारा ३८.८२ मेट्रिक टन

  9. एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा उचलून लावली विल्हेवाट

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा