IND vs ZIM 1st T20I : धोनीचा विक्रम मोडत श्रेयस अय्यरची दमदार एन्ट्री! सलग आठव्यांदा जिंकली नाणेफेक

- भारताने पहिल्या टी-२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्माला मिळाली संधी


मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या नाणेफेकीसोबतच अय्यरने भारतीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (IND vs ZIM 1st T20I)



श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा विक्रम :


कर्णधार म्हणून सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकत श्रेयस अय्यरने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सलग सात नाणेफेकींचा विक्रम मागे टाकला. भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणारा कर्णधार बनण्याचा मान आता अय्यरच्या नावावर जमा झाला आहे. (IND vs ZIM 1st T20I)



सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणारे भारतीय टी-२० कर्णधार:


- श्रेयस अय्यर – ८ वेळा (जून २०२६ ते जुलै २०२६)
- महेंद्रसिंह धोनी – ७ वेळा (मे २०१० ते फेब्रुवारी २०१२)
- विराट कोहली – ६ वेळा (ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०१९)
- रोहित शर्मा – ५ वेळा (फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२)
- महेंद्रसिंह धोनी – ५ वेळा (सप्टेंबर २००७) (IND vs ZIM 1st T20I)



अशोक शर्माला मिळाली पदार्पणाची संधी :


या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्मा याला भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. आयपीएलमधील प्रभावी कामगिरीनंतर त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आलेला अशोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी छाप पाडतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (IND vs ZIM 1st T20I)



भारताची प्लेइंग इलेव्हन :


वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव. (IND vs ZIM 1st T20I)



झिम्बाब्वेची प्लेइंग इलेव्हन :


ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (यष्टिरक्षक), बेन कुरन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी.


झिम्बाब्वे दौऱ्याची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे. (IND vs ZIM 1st T20I)

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या