Ashadhi Wari : ‘कापडी पिशवीची वारी’तून पर्यावरण आणि समतेचा संदेश; विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वारकऱ्यांची दाद

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘कापडी पिशवीची वारी’ या संकल्पनेद्वारे प्लास्टिकमुक्त वारीचा संदेश देतानाच विशेष विद्यार्थ्यांच्या कलेलाही व्यासपीठ मिळाले आहे.



या उपक्रमात नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने विठ्ठलाच्या विविध प्रतिमांनी सजवलेल्या कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्यांचे डिझाइन तयार करण्यासाठी प्रभादेवी येथील रचना संसद अप्लाइड आर्ट महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. त्यांच्या संकल्पनांवर आधारित आकर्षक चित्रे विशेष विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांवर साकारली आहेत.



या उपक्रमाचा उद्देश केवळ कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे नाही, तर पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि विशेष मुलांच्या कलागुणांना समाजासमोर आणणे हाही आहे. प्रत्येक पिशवीतून पर्यावरणाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व आणि सर्वांना समान संधी मिळावी हा संदेश दिला जात आहे.



श्रीरंग ट्रस्टचे डॉ. सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले की, विठ्ठल हा केवळ श्रद्धेचा विषय नसून निसर्गाशी जोडणारी भावना आहे. झाडे, नद्या, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण सृष्टीत विठ्ठलाचे अस्तित्व असल्याची भावना जपली पाहिजे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा स्वीकार करणे हीच निसर्गसेवा आणि विठ्ठलसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.


वारीदरम्यान या पिशव्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयींचा प्रसार केला जाणार आहे. विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृती त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि समाजातील सक्रिय सहभागाचे प्रतीक ठरत आहेत.


यावेळी आर्थर रोड परिसरातील पारशीवाडी मित्र मंडळानेही विशेष विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच रचना संसद महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. अदिती झा याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी