Nashik : नाशिकच्या 'या' भाजप आमदाराचं WhatsApp हॅक, थेट...

Nashik : नाशिकमधील एका भाजप आमदाराचं WhatsApp हॅक झाल्याची घटना घडली आहे. तुमची शॉपिंग डिलिव्हरी आली आहे. तुमचा पत्ता सांगण्यासाठी या नंबरवर डायल करा, असा फोन नाशिकच्या भाजपा आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) यांना आला, त्यांनी त्या नंबरवर फोन केल्यानंतर प्रतिसाद तर मिळाला नाहीच परंतु WhatsApp हॅक करून त्यांच्या नावाने अनेकांकडून पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) आणि त्यांचे पती महेश हिरे बुधवारी (दि.२२) मंत्रालयात होते. दरम्यान आमदार सीमा हिरे यांना एक विदेशी फोन आला आणि त्या व्यक्तीने सीमा हिरे यांना तुमच्याकडे शॉपिंग पार्सल द्यायचे आहे, तुमचा पत्ता सापडत नाही, तुम्ही या नंबरवर फोन करून पत्ता सांगा, असे सांगितले. घरातून कोणी ऑनलाइन शॉपिंग केले असेल आणि त्याचे पार्सल आले असेल असे वाटल्याने आमदार हिरे यांनी दिलेल्या नंबरवर पत्ता सांगण्यासाठी फोन केला.



'नीड यूवर हेल्प'


मात्र इथेच मोठा घोळ झाला. आमदार हिरे यांनी दिलेल्या नंबरवर पत्ता सांगण्यासाठी फोन केला त्यावेळेस संबंधिताने नंबर कट केला आणि त्या माध्यमातूनच हिरे यांचे WhatsApp हॅक केले. धक्कादायक म्हणजे त्यानंतर संबंधिताने WhatsApp वरून अनेकांना 'नीड यूवर हेल्प' असे मेसेज पाठवले आणि थेट पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.



मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे तक्रार


काही क्षणातच आमदार हिरे आणि महेश हिरे यांना याबाबत फोन सुरू झाले. त्यामुळे ते सतर्क झाले आणि त्यांनी फेसबुकवर आपला WhatsApp नंबर हॅक झाला असून, कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन केले. या प्रकारानंतर आमदार हिरे यांनी तातडीने मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे (Marine Drive Police) तक्रार केली आहे. अशा फेक मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन आमदार हिरे यांनी केले आहे.


दरम्यान, आमदार सीमा हिरे यांचे WhatsAppअकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे पोलिसांत तक्रार केली आहे. दिवसभरात तीनशे ते चारशे फोन आले. पैसे मागणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नये. तसेच कोणालाही फसवणुकीचे फोन आल्यास काळजी घ्यावी. असे आवाहन महेश हिरे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण