Ashadhi Wari : वारकऱ्यांसोबत रांगेत उभे राहून भरत गोगावले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन; आनंदवारी उपक्रमालाही दिली भेट

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा'; मंत्री भरतशेठ गोगावले यांची आनंदवारीत सेवाभावी चरणसेवा




पंढरपूर  : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांनी विविध धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कोणताही विशेष शासकीय प्रोटोकॉल न स्वीकारता सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukhmini) मंदिरात जाऊन कळस आणि नामदेव पायरीचे दर्शन घेतले. त्यांच्या या साध्या आणि वारकरी भावनेने अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेतले.


दर्शनानंतर मंत्री गोगावले यांनी कर्नाटकातील बंडींगणीमठाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नप्रसाद सेवेची भेट घेतली. त्यांनी वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी समतेचा आणि सेवाभावाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. (Anandwari)



यानंतर त्यांनी शिवसेनेतर्फे राबविण्यात आलेल्या 'आनंदवारी – पाऊले चालती पंढरीची वाट' या उपक्रमाला भेट दिली. या सुविधा केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी मोफत नाश्ता आणि भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी, औषधोपचार, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, विश्रांती व्यवस्था तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि माता-बालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांची त्यांनी पाहणी केली. (Varkari)


यावेळी मंत्री गोगावले यांच्या हस्ते आनंदवारीच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले.



सुविधा केंद्रात उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. काही वारकऱ्यांचे पाय दाबून त्यांची सेवा करत त्यांनी "वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा" हा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे अनेक वारकऱ्यांनी स्वागत केले.


दौऱ्यादरम्यान रोजगार हमी विभागाच्या 'संवाद वारी' उपक्रमालाही त्यांनी भेट दिली. चित्ररथ आणि पथनाट्याच्या माध्यमातून व्ही.बी.जी. रामजी योजनेची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत होती. मंत्री गोगावले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अधिकारी, कर्मचारी आणि कलाकारांचे अभिनंदन केले.


या कार्यक्रमाला पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके, रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी