IND vs ZIM : पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा विजय, मयंक यादवच्या वेगासमोर झिम्बाब्वे ढेर!

वेगवान गोलंदाज मयंक यादवची (Mayank Yadav) भेदक गोलंदाजी आणि सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) अवघ्या १८ चेंडूंतील तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० (T-20) सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


सामन्यात नाणेफेक (Toss) जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मयंक यादवने आपल्या ४ षटकांत अवघ्या १८ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. त्याला प्रिन्स यादवने (२/१९) उत्तम साथ दिली. शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरेने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर रायन बर्लने २६ धावांचे योगदान दिले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवरच रोखता आले. या सामन्यातून भारताच्या अशोक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले.



१२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या १ धावेवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसे काढली. वैभवने अवघ्या १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आपले झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. तो ५० धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने भारताचा विजय सुकर केला होता. क्रिकइन्फोने त्याला सामन्यातील 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' म्हणून घोषित केले.
वैभव बाद झाल्यानंतर इशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावांची उपयुक्त खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी फलंदाजी करत २४ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या, तर तिलक वर्माने नाबाद ६ धावा करत भारताला १३.२ षटकांत ३ बाद १२६ धावांवर पोहोचवून विजय मिळवून दिला.भारताने तब्बल ४० चेंडू राखून हा सामना सहज खिशात घातला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानीने २ बळी घेतले, तर रिचर्ड नगारावाला १ बळी मिळाला.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून