नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली असून भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही कबड्डी संघांचा 'अ' गटात समावेश करण्यात आला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जपानच्या आयची प्रांतात होणार आहेत. कबड्डीच्या स्पर्धा २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान तोकाई सिटिझन्स जिम्नॅशियम येथे रंगणार आहेत. पुरुष गटात एकूण १० संघ सहभागी होणार असून त्यांना प्रत्येकी पाच संघांच्या दोन गटांत विभागण्यात आले आहे. भारताचा समावेश असलेल्या 'अ' गटात बांगलादेश, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई आणि यजमान जपान यांचा समावेश आहे.
पुरुष कबड्डी गटवारी :
'अ' गट: भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई, जपान 'ब' गट : नेपाळ, थायलंड, पाकिस्तान, मलेशिया, इराण






