Parth Pawar : पार्थ पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात; कोण आहेत कायनात दारा? जाणून घ्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यसभेचे खासदार (Rajya Sabha MP) पार्थ पवार (Parth Pawar) यांनी कायनात दारा (Kainat Dara) यांच्याशी विवाह (Marriage) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे. त्याआधी २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा (Engagement) समारंभ होणार आहे.


मागील काही दिवसांपासून कायनात दारा यांच्या नावाबाबत आणि मूळ गावाबाबत विविध माध्यमांमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत होती. यानंतर पार्थ पवार यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती (Official Information) देत या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. अनेक माध्यमांनी त्यांचा उल्लेख काश्मिरी म्हणून केला होता. मात्र त्या काश्मिरी नसून पंजाबी (Punjabi) आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



कायनात दारा यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित 'द ब्रिटिश स्कूल' (The British School) चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जगातील नामांकित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' (London School of Economics - LSE) मधून उच्च शिक्षण (Higher Education) घेतले. सामाजिक शास्त्रे (Social Sciences), अर्थशास्त्र (Economics), आंतरराष्ट्रीय संबंध (International Relations) आणि सार्वजनिक धोरण (Public Policy) या क्षेत्रांमध्ये एलएसईला (LSE) जागतिक स्तरावर विशेष मान्यता आहे.


उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायनात दारा यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिनी (English News Channel) एनडीटीव्ही (NDTV) मध्ये आऊटपुट एडिटर (Output Editor) आणि रिपोर्टर (Reporter) म्हणून काम केले आहे. पत्रकारिता (Journalism) क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची धुरा स्वीकारली.


सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी (Hospitality) आणि रिअल इस्टेट (Real Estate) व्यवसायात कार्यरत आहेत. पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार असून, या विवाहानंतर कायनात दारा या उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाचा भाग होणार आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण