Navnath Ban : मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न! भाजपच्या नवनाथ बन यांचं थेट प्रत्युत्तर

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ट्वीट करत रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. (Rohit pawar)

"विरोधकांकडून केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केला. रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. (Navnath Ban)




नवनाथ बन यांनी म्हटले की, संबंधित व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावून मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र, व्हिडिओ नीट पाहिल्यास संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत. उलट ते निळ्या शर्टमधील एका व्यक्तीला पकडण्यासाठी धावत असल्याचे स्पष्टपणे दिसते, असा दावा त्यांनी केला.



राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही घटनेबाबत सार्वजनिक आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (Mumbai Police)



रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा. दरम्यान, या प्रकरणावर रोहित पवार किंवा संबंधित पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. (Political News)
Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर