Beed Suicide News : बीडमध्ये धक्कादायक घटना; आईची 4 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी

बीड (Beed) जिल्ह्यातील शिदोड गावातून एक काळीज पिवटाळून टाकणारी घटना समोर आली आहे. 25 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. (Suicide)


मृत महिलेचे नाव अवंती तुषार शेंडगे तर तिच्या मुलीचे नाव तन्वी तुषार शेंडगे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास अवंती आपल्या मुलीसह घरातून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटूनही दोघी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. (Beed News)



शोधमोहीम सुरू असताना गावाजवळील नदीकाठच्या एका विहिरीजवळ त्यांची चप्पल आणि मोबाईल आढळून आला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि विहिरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. (Police Investigation)


रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधकार्यात अखेर मध्यरात्रीच्या सुमारास आई आणि मुलीचे मृतदेह (Deathboy) विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर शिदोड गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा शोध घेतला जात आहे. (Suicide Case)


अवघ्या 4 वर्षांच्या मुलीसह आईने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिदोड गावात शोकाचे वातावरण असून अनेकांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी