UP Crime : १० रुपये चोरल्याच्या संशयावरून विद्यार्थिंनीला बेदम मारहाण; अपमान सहन न झाल्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

उत्तर प्रदेश : मुझफ्फरनगरमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षाच्या मुलीने दिनांक १० जुलै रोजी तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. शाळेतील शिक्षकांनी मारहाण तसेच १० रुपये चोरल्याचा आरोप करून सर्वांसमोर अपमानित केले यानंतर काही तासांतच तिने टोकाचे पाऊल उचलले.मुलीच्या वडि‍लांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री दोन सरकारी शाळेतील शिक्षकांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे.


आयुषी ही मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पचेंडा कलान येथील शासकीय प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होती, तिच्या कुस्तीच्या खेळामुळे ती स्थानिक पातळीवर चर्चेत होती. पैलवान बनण्याचे स्वप्न पाहणारी आयुषी आखाड्यात नियमितपणे सराव करत असे.


तक्रारीनुसार, शाळेतील शिक्षिका (Teacher)सविता यांनी आयुषीवर त्यांच्या पर्समधून (Purse) १० रुपये चोरल्याचा आरोप केला. घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास आयुषीचे वडील अशोक राजपूत यांना फोन करून कळवण्यात आले परंतु, ते काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी शिक्षकांना आपल्या मुलीला समजावून घरी पाठवण्याची विनंती केली.पण त्याऐवजी, शिक्षिका सविताने ही बाब राजीव नावाच्या दुसऱ्या शिक्षकाला सांगितली आणि त्यांनी वर्गातच त्या विद्यार्थिनीला मारहाण केली आणि तिच्या वर्गमित्रांसमोर तिचा अपमान करण्यात आला.




घाबरलेली आयुषी शाळेतून घरी परतली आणि वडिलांना सर्व परिस्तिथी सांगितली की तिने पैसे चोरले नव्हते, तर टेबलाखाली (Table) पडलेली ₹१० ची नोट तिने सहज उचलली होती त्यानंतर, त्याच दिवशी ती तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


एका खोट्या आरोपावरून तिला मारहाण झाली नसती आणि सार्वजनिकरित्या अपमानित केले नसते, तर माझी मुलगी आज जिवंत असती, असे म्हणत राजपूत यांनी शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी शिक्षक सविता आणि राजीव यांच्या विरोधात बीएनएस कलम १०७ (मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण