Western Railway : पश्चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

मुंबई, गुजरातहून बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे सेवांना मुदतवाढ


मुंबई : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेने १३ विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या मुदतवाढीमुळे मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातून बिहार, उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण २६ जुलै २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचे थांबे, वेळा आणि डब्यांची संरचना यासंबंधी सविस्तर माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. (Western Railway)



मुदतवाढ देण्यात आलेल्या प्रमुख विशेष गाड्या :


मुंबई सेंट्रल–कटिहार विशेष ही गाडी २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत, तर कटिहार–मुंबई सेंट्रल विशेष ही गाडी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे. मुंबई सेंट्रल–बनारस विशेष ही गाडी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, तर बनारस–मुंबई सेंट्रल विशेष २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. अहमदाबाद–दरभंगा विशेष आणि दरभंगा–अहमदाबाद विशेष या गाड्यांना अनुक्रमे ११ आणि १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वडोदरा–गोरखपूर विशेष आणि गोरखपूर–वडोदरा विशेष या गाड्या सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहतील. वलसाड–दानापूर विशेष, सुरत–छपरा विशेष, उधना–मधुबनी विशेष, उधना–हसनपूर विशेष, उधना–झंझारपूर विशेष यांसह अन्य विशेष गाड्यांच्या फेऱ्यांनाही सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Special Trains)

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर